- वेळ अमावस्या -
मराठवाड्यात आढळणारा ठराविक सण ...
05 जानेवरी 2019 :
( खुलगापुर , ता. जि. लातूर )
( खुलगापुर , ता. जि. लातूर )
आज वेळ अमावस्या. मराठवाड्यातील शेतकरी
आतुरतेने या अमावस्येची वाट पाहात असतो.
शेतात हा दिवस सण-उत्सवाप्रमाणे साजरा
केला जातो.
![]() |
कडब्याची खोप |
तालुक्यांमध्ये अमावस्या म्हणजेच "वेळ अमावस्या" मोठ्या
उत्साहाने साजरी केली जाते.
ही अमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखतात .
हा सण शेजारील कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात आला,
मूळ कर्नाटकी कानडी शब्द "येळ्ळ अमावस्या" म्हणजे
पेरणीनंतर
येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या,
याचाच नंतर "वेळ अमावस्या" असा शब्द रुढ झाला.
लातुरसारख्या शहरात ह्या दिवशी अघोषीत
संचारबंदी असल्यासारखी असते,
कलेक्टर डिक्लेअर्ड हॉलीडे असतो.
बँकाना वगैरे सुटी नसते पण लोक
सकाळपासुनच शेतात गेल्यामुळे काम फारसे नसते. यादिवशी व्यापारी व ईतर
व्यवहार
पुर्णपणे बंद असतात.
![]() |
पांडवांची पुजा |
वेळा अमावस्येनिमित जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद असतात. लातूर शहरात
रस्त्यावर नागरिकांची ये-जा नसते. शहरात सर्वत्र शांतता दिसून येते.
त्या दिवशी पाहिला एक माणूससुद्धा तुम्हाला शहरामध्ये दिसणार नाही.
या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घरपरिवारासह शेताकडे जातात.
तर एक व्यक्ती एका रंगविलेल्या
माठामध्ये अंबिल भरून त्याचा गावातील
ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर
आणले जाते.
:- खाण्यासाठी पदार्थ
- सर्वभाज्या एकत्र करून शिजवलेली भज्जी
- ताकाचे अंबिल
- ज्वारी व बाजरीचे भाकरी
- तीळाची पोळी
- गोड गव्हाची खीर
- आंबट भात
- धपाटे
असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य
केला जातो आणि तेच जेवण सर्वांना देण्यात येते.
सर्वलोक शेतात जेवणासाठी जात असतात आणि
ज्यांना कुठेच जाणे शक्य
होत नाही ते लोक गावातील सार्वजनिक बागेत, जवळच्या वनराईतल्या मंदिराच्या
ठिकाणी
डबे घेऊन भोजनाचा आनंद घेतात.
या अमावस्याला शेतात कडब्याची खोप करून
पांडवांची पूजा करण्याची कर्नाटकातील
काही जिल्ह्यात पद्धत आहे. हीच पद्धत कर्नाटकाला निकट असलेल्या
लातूर
आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आजही सुरू आहे. काहीच्या मते ही काळ्या आईची
पूजा
असते. त्यामुळे कृषी संस्कृतीमध्ये या अमावस्येला अधिक महत्व दिले आहे.
गहू, हरभरा, करडी, ज्वारी, आदी पिकांमध्ये चर शिंपून हंगाम चांगला
होऊ दे अशी
प्रार्थना यावेळी लक्ष्मी चरणी करण्यात येते.
एकंदरीत विचार करता इतर सणांमध्ये
आढळणारी निसर्गाची हानी या सणांत नाही...!
याउलट माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन
त्याचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा
हा सण !
हा सण !










Comments
Post a Comment